सध्याचा काळातील एक पूर्णपणे वेगळा विषय .. काहीतरी वेगळया वाटेने चित्रपट जातो .
यमुना आणि अक्का ने जीव ओतून काम केले आहे ,
गरिबीत असणारा संघर्ष, झोपडपट्टीतील वातावरण, सगळे मनाला चटका लाऊन जाते,
उगीचच वाटते की चित्रपटाचा शेवट थोडा वेगळा असावा, काहीतरी राहुन जाते,
पण असाच विचार करायला प्रेक्षकांना लावायचे असेल तर रवी जाधव त्यात यशस्वी झाला आहे, कारण चित्रपट संपल्यावर कोणीही उठत नाही