आवर्जून पहावा असा चित्रपट!
मी सनसीटी पार्लेचा शो पाहिला तो हाउस फ़ुल होता. अनेकजण तिकीट न मिळाल्याने परत गेले.
सुबोध भावे यांचा उत्कृष्ट अभिनय तसेच प्रत्येक सह कलाकाराने आपापली व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. चित्रपट गुतवून ठेवतो. चित्रपट संपल्यावर प्रत्येकाच्या तोंडून ‘आणी डॉ. घाणेकर’ मस्त जमलाय हीच प्रतिक्रिया मिळते.