सुभेदार... First Day..First Show.. With All Family..!!
एक मराठी माणूस म्हणून सुभेदार चित्रपट पाहण्यासाठी चातकाच्या पक्षाप्रमाणे वाट पाहत होतो आणि आज तो दिवस उजाडला. पोरीने चार दिवसांपासून घर डोक्यावर घेतले होते,पप्पा आपण पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा लगेच चित्रपट पहायला जायचा म्हणून...असो
पुन्हा एकदा दिग्दर्शक दिग्पाल दादा लांजेकर यांनी एक शिवकालीन चित्रपट कसं असावं हे दाखवून दिले.
चित्रपटातील ती जूनी भाषा,कथा, ऐतिहासिक वास्तू, संदर्भ, वेशभूषा आपल्याला तीन तास शिवकालीन युगात घेऊन जाते एवढं मात्र निश्चित.
कुठलाही डोलारा न उभारता, भपकेबाजी न करता आहे तो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी देखील झाला आहे.
ऐ उदयभान्या म्हणून सुभेदार तानाजी राव मालुसरे यांची शेवटची लढाई आणि संवाद मनात खोलवर रुजली. मागे हिंदी चित्रपट तानाजी यापेक्षा हा चित्रपट वास्तववादी आहे एवढं मात्र निश्चित.
छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी राव मालुसरे यांची मैत्री,कोंढाण्याची मोहीम, रयतेचा राजा कसा होता हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
सुभेदार यांच्या भुमिकेत अजय पुरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर, जिजाऊ यांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी आणि उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिग्विजय रोहीदास यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे.
निष्ठा कशी असावी सुभेदार तानाजी यांनी दावल..
भाऊ कसा असावा हे सुर्याजी ने दावल..!!
म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्याल..
त्या समध्याशी मार्ग दाखवायला एक शिवाजी राजं हवच...!!
सुभेदार रडवले तुम्ही आजही...!!
जय भवानी..
जय शिवाजी..
हर हर महादेव...!!!