प्रदीर्घ लॉक डाऊनचा शिण घालवणारा झिम्मा
मराठी चित्रपट वरचेवर अधिक प्रयोगशील होत आहे. Covid मुळे मनोरंजन क्षेत्राला जबर झटका बसला. त्यातही थिएटरला OTT सारखे पर्याय झाल्याने मोठा पडदा कोलमडून पडतो की काय, अशी धास्ती निर्माण झालेली. या पार्शवभूमीवर झिम्मा सारखा हटके चित्रपट मोठ्या पडद्यावर येतो आणि महिला वर्गाला प्रचंड मोहिनी घालून दोन आठवडे यशस्वीपणे चालू शकतो... हे एक सुखद आश्चर्य आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी कल्पक आणि वेगवान दृश्य योजना केले आहे. सुहास जोशी, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सायली जाधव, मृण्मयी गोडबोले, वैशाली बांदेकर अशा सात स्त्री कलाकारांनी अख्खा चित्रपट लिलया पेललाय.
निखळ मनोरंजन तर आहेच, पण स्त्रियांचे भावविश्व ज्या नजाकतीने साकार केले... त्यामुळे त्यात प्रत्येक स्त्रीला आपले प्रतिबिंब सापडतेच.. ! यात रुढ अर्थाने कोणी नायक, व्हीलन नाही. मारधाड, गुलाबी दृश्य काहीही नाही, तरीही चित्रपट शेवट पर्यंत खिळवून ठेवतो.. खळाळून हसवितो तसा नकळत जीवनाचे सत्यही सांगतो..... हे त्याचे मोठे यश आहे.
.. न