"ने माझसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला" भारतभूमीच्या दर्शनासाठी आर्ततेने रचलेली ही कविता प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे केल्याशिवाय राहत नाही. वीर सावरकर ह्यांचा जीवन प्रवास नेहेमीच दुर्लक्षित राहिलाच,
पण इतक्या वर्षानंतर त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या एका उत्कृष्ट सिनेमाकडे भारतीयांनी दुर्लक्ष करावे ही किती वाईट बाब आहे. अखंड भारत मातेचे स्वप्न अखेरच्या श्वासापर्यंत पहाणारे, सर्व सुखाचा त्याग करून भारत मातेसाठी आपले प्राण पणाला लावणारे वीर सावरकर ह्यांचा ऐतिहासिक जीवन प्रवास नेहेमीच दुर्लक्षित राहिला. रणदीप हुडा याने सिनेमात हाच प्रवास प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण बाजूला सारून फक्त एक भारतीय म्हणुन हा सिनेमा पाहा. पूर्ण सावरकर कळणे कदाचित कोणालाच शक्य होणार नाही पण सावरकरांमधला काही भाग जरी कळाला तरी त्यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाला आपल्या कडून श्रद्धांजलि वाहिली असे आपण समजू.
-एक भारतीय
वंदे मातराम.