- अत्यंत चपखल चित्रपट.... ❤️😇🙏🏻🧿
- ज्यांनी सावरकर वाचले आहेत त्यांना नक्कीच आवडेल आणि ज्यांनी सावरकर वाचले नाहीयेत त्यांना पण आवडेल असा.
- काही ठिकाणी Direction अजून प्रगल्भ करता आले असते पण तो भाग निव्वळ अगदी २-३ प्रसंगांसाठी.
- बाकी चित्रपट खूपच सुरेख झाला आहे.
- रणदीप हुडा चे काम विशेष वाखाणण्यासारखे झाले आहे. बाकी कलाकार पण उत्तम. किमान २ वेळा तरी पहावा असा चित्रपट बनवला आहे.
- चित्रपट निर्मितीसाठी त्या काळाच्या नुसार ज्या गोष्टी, स्थळ, पेहेराव, प्रवास माध्यम, ई. चा योग्य अभ्यास करून सामोरं आणलेलं आहे.
- पु. ल. देशपांडे ह्यांच्यावर पण २ भागांचा चित्रपट करावा लागला, इथे तर सावरकर आहेत, आणि ते पण ३ तासात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे थोडा storyline wise adjust करावा लागतो इतकच.
- केवळ ३ तासांमध्ये सावरकर सांगणे, दाखवणे हे अशक्य काम आहे. त्यातल्या त्यात रणदीप हुडाने हे शिवधनुष्य थोडक्यात पेलले आहे असं म्हणण योग्य ठरेल.
- कोणत्याही नेत्याला, धर्माला, पंथाला, राजकीय पक्षाला इथे चुकीचं दाखवल नाहिये तर् फक्त आणि फक्त आदरणीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचे दृष्टिकोन, निती, निर्णय तसे का होतें हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
ज्यांना सावरकर त्यांच्या जिवंतपणी समजले नाहीत, त्यांच्या पक्षाला, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आताच्या काळात सावरकर कसे समजणार 🤣.
असो!
चित्रपट उत्तम, सर्वांना शुभेच्छा. 🙏🏻
जय हिंद, जय शिवराय 🙏🏻😇🧿