पैसा मिळवायचे म्हणून काहीही लिहायचे व कसे ही करुन समाजात वाईट विचार पसरवायच काम करीत आहेत..
एकत्र कुटुंब पद्धतीत वाईट विचार मांडून कलर्स वाहिनीची प्रतिमा खराब करित आहेत....एक स्त्रीच दुसर्या स्त्रीचा किती वाईट विचार करित असेल याच घाण उदाहरण ही मालिका समाजा समोर मांडत आहे.
मराठी माणूस, आपुलकी , माणुसकी , खाल्ल्या ताटात छेद पाडून व नीच प्रवृत्ती दाखवून पैसा मिळत असेल पण एके काळचे आघाडीचे कलाकार अशा सिरियल मध्ये काम करत आहेत हे कशाच लक्षण आहे ?
संस्कृती , आपलेपण , दुसऱ्याची संपत्तीवर डोळा ठेवून खून , मारामारी, जीवघेणा हल्ला तो पण आपल्याच माणसाकडून...
टी आर पी वाढत असेल अशी भावना असेल तर ते साफ खोट बोलत आहेत पण त्याच बरोबर धडाकेबाज कलाकारांवर नामुष्की नक्कीच आणतील ह्यात शंका नाही.