आताच स्वातंत्रवीर सावरकर सिनेमाचा प्रीमियर पहिला.
`अप्रतिम सिनेमा, भारतीय स्वातंत्र्याचा मुद्दाम लपवून ठेवलेला आणि खरा असणारा इतिहास कळून घ्यायचा असेल तर सिनेमा पाहणे 'मस्ट' -दत्ता आफळे`
रणदीप हुड्डा अक्षरशः सावरकर जगला आहे.
सावरकरांचे हिंदुत्व, त्याची व्याख्या, भूमिका किती स्पष्ट होती आणि आजही ती लागू होते.
गांधीचा दांभिकपणा छान उघड केलाय.
आपले स्वातंत्र्य नेताजींच्या सशस्त्र उठावामुळे इंग्रजांना द्यावे लागले हे दाखवताना आपले डोळे उघडतात, कारण आपल्याला शिकवला गेलेला इतिहास अनेक वस्तुस्थिती लपवलेला आणि वेगळाच आहे.
लोकमान्य टिळकांच्या राजकीय भूमिकेचा सावरकरांवरील प्रभाव सुरेख दाखवला आहे.
टिळकांच्या अकाली मृत्यूनंतर राष्ट्रीय नेतृत्वाची 'ती' जागा गांधींना मिळाली.
एकूणच, हा सिनेमा आपण तर पहावाच पण आपले पाल्य यांनीही तो जरूर पहावा असे आपण काहीतरी करावे म्हणजे या पिढीला काँग्रेस आणि त्याचा धार्मिक दांभिकपणा कळेल यासह स्वातंत्रवीरही कळतील.
स्वातंत्रवीरांनी सहन केलेले सेल्युलर जेलमधील अत्याचार आपल्या अंगाची लाहीलाही करतात आणि सावरकरांनी ते कसे सहन केले त्यांच्या त्या त्यागास आणि सहनशक्तीस आपल्या कातडीचे जोडे केले तरी उपकार फिटणार नाहीत हे पटते. सावरकर कुटुंबीय म्हणजे त्यांचे दोन्हीही बंधू यांचेही योगदान अतुल्य आहे.
नेपथ्य, कपडेपट, लोकेशन्स या सर्वांमुळे तो काळ स्पष्ट समोर येतो. हा सिनेमा आपण आवर्जून पहावा असाच आहे.
~दत्ता आफळे