An Unforgettable Journey to the Peshwa Era and its artistic & intellectual richness- A Cinematic Marvel!
******
मला खरोखरच खूप मनापासून असं वाटतंय की सर्वांनी आणि अधिक करून ज्यांना एखाद्या तरी कलेची आवड किंवा कलेबद्दल आदर आहे त्यांनी नक्की हा मूव्ही बघावा; म्हणून एवढं जास्त लिहितोय!
Tbh when I entered the theatre I was a Prajakta Mali hater due to her repetitive 'wah dada wah' in between hasya jatra acts. But ngl I came out of the theatre becoming a huge fan of her with immense respect for her acting & dance craft!!!
खरं तर मी खूप कमी अपेक्षा ठेऊन आणि सगळे जातायत म्हणून सोबतीने जाऊ ह्याच विचाराने "फुलवंती" बघायला गेलेलो. पण थिएटर मधून बाहेर पडताना मराठी मधील ह्या वर्षीची एक अत्युच्च दर्जाची कलाकृती थिएटर मधे जाऊन पाहिली ह्याचं समाधान आणि पेशवाई च्या काळात खरंच सगळ किती भव्य आणि पवित्र आणि निखळ असेल हा विचार आणि मनस्वी आनंद घेऊन बाहेर पडलो.
ह्या गोष्टींसाठी "फुलवंती" नक्की पहा:
१) भव्य आणि अगदी त्या काळात घेऊन जाणारे realistic सेट्स
२) प्राजक्ता माळी, गष्मिर आणि इतर सर्वांचीच उत्कृष्ट casting आणि acting
३) अतिशय सुंदर आणि technically sound म्युझिक आणि गाणी
४) मस्तानी आणि फुलवंतीचा डोळ्यात पाणी आणणारा डान्स सीन
५) "मदनमंज़िरी" गाण्यावरील मंत्रमुग्ध करणारं नृत्य !
६) Interval पर्यंतचा अत्युच्च प्रतीचा आणि थेट त्या काळात teleport करवणारा theatrical experience
७) शास्त्रीबुवांचा वाडा आणि तिथल पेशवेकालीन वातावरण
८) पेशव्यांच्या दरबाराचा near perfect सेट
९) पैजेचा आणि स्पर्धेचा सीन
१०) The climax!