खूप चांगला चित्रपट. ज्यांचे वय जास्त आहे किंवा स्वतःविषयी कॉन्फिडन्स वाटत नाही त्यांनी आवर्जून पहावा असा चित्रपट. माणसाच्या आयुष्यात बरीच स्वप्न अपुरी राहतात तरीसुद्धा स्वप्न बघायचं सोडू नये असं सांगणारा चित्रपट. सगळ्यांच्याच भूमिका त्या त्या साच्यामध्ये फिट्ट बसणारे आहेत. गजानन कुलकर्णी असुदे किंवा तो त्यांना भेटलेला त्यांचा मित्र किंवा त्यांच्या मावशीच्या मुलीची मैत्रीण ही ल्ह्याच्या विषयी प्रेम वाटतं. मात्र कथानक इतक्या सुंदर पद्धतीने उलगडलेलं आहे ही त्यात माणूस हरवून जातो. शेवट काहीसा निराशाजनक आहे स्पष्टीकरण होत नाही त्यामुळे शेवट थोडा वेगळा झाला असता तर बरं झालं असतं. स्वतःला शहाणे समजणारे कॉलेजमधील मुलं-मुली आणि खरा ज्ञानवंत पण स्वतः हरवलेला एक व्यक्ती यांच्यामधील तुलनात्मक संघर्ष आणि त्यातून त्यांनाच गवसणारा सुर खूप सुंदर रित्या चित्रीत केलेला आहे.