स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या आयुष्यावर चित्रपट येऊन त्यांची जीवन कहाणी लोकांसमोर येणे खूप गरजेचे होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने कशाप्रकारे सर्व आयुष्य देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी समर्पण केले हे सर्वांना समजणे खूप आवश्यक होते. त्यांचे महान विचार, दुर्दम्य आत्मबळ, सहनशक्ती, लक्ष्य, देशहिताने प्रेरित असलेल्या कृती हे सर्व अत्यंत समर्पकपणे लोकांसमोर मांडलेले आहे रणदीप हुडा यांनी. सर्वांचा अभिनय उत्कृष्ठ👌 आवर्जून पहावा असा चित्रपट.