अडीच तासाच्या चित्रपटात सावरकरांना न्याय दिला जाऊ शकत नाही.
मी हा चित्रपट पाहिला आहे. सावरकर हा विषय बाजूला ठेवला तर चित्रपटप्रेमी या नात्याने हे सांगतो की, ज्याला दर्जेदार चित्रीकरण म्हणतात, सिनेमेटोग्राफी म्हणतात, कॅमेरा, साऊंड, बॅक ग्राउंड म्युझिक या सर्व स्तरावर हा चित्रपट उत्तम आहे.
सावरकर जसे दिसत होते तसेच दिसायला हवे म्हणून रणदीप हुडा याने शरीरयष्टी, देहबोली, चेहरेपट्टी, तुरुंगात असताना पडलेले टक्कल व सडलेले दात... यावर जबरदस्त मेहनत घेतलेली आहे.
मला वाटते रणदीप हुडा याने यावर वेब सिरीज बनवायला हवी होती पण एखाद्या बलदंड व्यक्तित्वाने अशा भूमिकेसाठी इतक्या दिवस स्वतःचे शरीर झिजवणे सोपे काम नाही.
रणदीप हुडा याने सावरकरांसाठी जे धाडस केले आहे, जो त्याग केला आहे त्यासाठी एक मराठी हिंदू म्हणून मी आजन्म ऋणी राहील.