*हान की बडीव
इतिहास घडीव *...
बहुचर्चित झी स्टुडिओ प्रस्तुत, आटपाट निर्मित घर बंदूक बिरयाणी 7 एप्रिल ला
सिनेमागृहात दमदार प्रदर्शित झाला.अभिनेते,कल्पक दिग्दर्शक नागराज आण्णा मंजुळे यांनी साकारलेल्या डॅशींग पुलिस अधिकारी राया पाटील एकदम झकास,सोबत अभिनेते सयाजी शिंदे साकारलेला नक्षलवादी म्होरक्या पल्लम क्रुर प्रसंगी तितका विनोदी,आकाश ठोसर व सायली पाटील या फ्रेशजोडीचा सुंदर अभिनय,अभिनेते प्रविण डाळींबकर(गुरा), विठ्ठल काळे(जॉर्ज) व इतर सहकलाकारांचा दमदार अभिनय. नावाप्रमाणेच हटके कथा,पटकथा, संवाद, दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे यांचा यशस्वी प्रयत्न, विक्रम अमलाडी यांचा उत्तम छायाचित्रण, ए.व्ही प्रफुल्लचंद्र यांचा सुपरहिट संगीत, बॉलिवूड गायक मोहित चौहान यांचा पहिला मराठी गीत टायटल ट्रॅक एकदम बेस्ट,करमाळा स्पेशल हलगी सॉंग लय भारी...शेवटी नेहमी प्रमाणे क्लायमॅक्स सस्पेन्स.
एकंदरीत घर बंदूक बिरयानी ची चव प्रेक्षकांनी सिनेमागृहात जावून नक्कीच चाखायलाचं हवी...
🙏 संदीप टेकुर (जालना)