अप्रतिम चित्रपट आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पाहावा असा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान काय आहे ते हा चित्रपट पाहिल्यावर मुलांना कळेल. किती अमानुष यातना सहन करूनहि त्यांचे स्वातंत्र्य मिळवण्याचे ध्येय अजिबात विचलित झाले नाही. ही आत्ताच्या पिढीला समजून घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे सर्वांनी हा सिनेमा पहावाच.