"चित्रपट" कसा असतो हे सतीश राजवाडे जाणतो, त्याला पटकथा, संकलन, दृश्य-मांडणी, कथानकाचा एकंदर काळ-काम-वेग याचा ताळमेळ कसा "बसवावा" याची चांगली आणि सुयोग्य समज असल्याचे त्याने सिद्ध केलंय.
सादरीकरणाची भट्टी व "नागरगोजे"द्वारा व्यापक मराठी प्रेक्षकापर्यंत पोहोचण्यासाठी जमवलेली व्यावसायिक गणितं यामुळे सिनेमा *बघणीय* व *ऐकणीय* होतो हे यातून उत्तम रीतीने दाखवून दिलं आहे.
सर्वश्री विवेक बेळे, सतीश राजवाडे, सुहास गुजराती, सुनिल अगरवाल, राहुल भातणकर, समीर फातरफेकर ह्या कलाकारांनी ( तंत्रज्ञ हा सुद्धा कलाकारच आहे ना ?) व कथेतील पात्रांना खऱ्या अर्थाने आत्मा प्रदान करणारे सुमित, इरावती आणि नाना या सर्व जाणत्या "मानसांचे" आभार, त्यांनी आमच्या खर्च केलेल्या पैशाची व वेळेची व्याजासहित परतफेड केली.
(सतीशसाठी एक विचारावंस वाटतं.... एक *मृगजळ* सोडला तर तुझ्या त्यानंतरच्या प्रत्येक कलाकृतीचा "शेवट" उरकून टाकल्यासारखा किंवा कसाबसा करून टाकल्यासारखा मला वाटत आलाय; का बरं?)