सावरकरांचे एकूणच संघर्षमय आणि दिव्य - दाहक असे जीवन प्रेरणादायी आहेच, पण त्यातही प्रभावी आहे तो त्यांचा तेजस्वी हिंदुत्वाचा विचार. हिंदू कोण, इथपासून त्यांनी मांडलेले विचार सावरकर थेट प्रेक्षकांना सांगत असल्याने हा चित्रपट एक वेगळा प्रभाव पाडून जातो.