🇮🇳🚩 स्वातंत्र्यवीर सावरकर हा मानवतेचा सर्वांगसुंदर असा विचार आहे . आणि आपल्या देशाची त्रिकाल कालाची गरज आहे . सावरकरांचे साहित्य आणि नांव आजपर्यंत जाणीवपूर्वक दडपले गेले . त्यांच्या साहित्याचे प्रसार करण्याचे नाटक आणि सिनेमा हीच सर्वात प्रभावी माध्यम आहेत . त्यांची संगित उःशाप , संगित उत्तरक्रिया आणि संगित संन्यस्त खड्ग ही नाटके पुन्हा आजच्या पिढीपर्यंत यायला हवीत . त्यांचे 1857 चे स्वातंत्र्य समर पहिल्यांदा भारतात चालले नाही . पण परदेशात ते अतिशय गाजल्यावर आपल्या लोकांना त्याची जाग आली अगदी राज कपुर च्या मेरा नाम जोकर रशिया मध्ये हिट झाल्यावर आपल्याकडे सुपरहीट झाला . लिहिण्याचे कारण जे विरोधक तोंड वाकडी करतायत त्यांची तोंड हा चित्रपट बाहेर असाच गाजेल तेव्हा आपल्या इथे तिकिट मिळणं मुश्कील करील . अर्थात आत्ताही आहेच .
एकंदरीत संपुर्ण विश्वाला अमर्याद काळासाठी मानवतेचे विचार देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय . असे विचार दाखवणारा हा चित्रपट आहे .
प्रत्येक शाळेत आणि कॉलेज मध्ये हा चित्रपट दाखवणे अनिवार्य असावे असे माझे मत आहे . वंदे मातरम् !!!🚩