अतिशय सुंदर चित्रपट. नावावरून विषयाची काहीच कल्पना येत नव्हती. सुरुवातीपासूनच एवढी पकड घेतली की आमचं अस्तित्व राहीलच नाही जणू...म्हणजे घर बंदूक बिर्याणीचा एक भागच होऊन गेलो आम्ही. नक्षलवादासारखा गंभीर विषय त्यातलं वास्तव परिणामकारक रीतीने दाखवत थ्रिलर कॉमेडीच्या अंगाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे केवढे आव्हानात्मक आहे पण नागराज आणि टीम ने ते एवढं यशस्वीरीत्या पार पाडलय की पूर्ण चित्रपट पाहून झाल्यावर ही ते त्याच गारूड मनावरून काही उतरतच नाही.