अवघ्या तीन तासाच्या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण कार्य दाखवणे अशक्य आहे,हा चित्रपट म्हणजे हिमनगाचे टोक आहे, पण यात खरा इतिहास समोर येत आहे,रणदीप हुंडा सारख्याअमराठी माणसालाही त्यांचे कर्तृत्व मांडावेसे वाटले यातच सर्वकाही आले,सावरकरांचे हिंदुत्व आणि विज्ञान निष्ठा दाखविणारे प्रभावी संवाद यात आहेत.सावरकर चरित्राचा अभ्यास असेल तर सगळे प्रसंग समजतात, पण आजकाल वाचनापेक्षा दृष्य माध्यम भावतं,हा सावरकर विचारांचा प्रवाह सुरू झालाय, "आझादी के 75 साल बाद "हे होत आहे हेही नसे थोडके.