महाराज बाजींना शेवटचं कडाडुन भेटतात.....
मनात ही जाणीव, आपल्यासाठी 300 जण प्राणाची आहुती देतायेत....
पाऊल निघत नाही त्यांचं खिंडीतुन....
विशालगडाचा दरवाजा उघडुन लगबगीने जाऊन तोफा वाजवायला बजावतात....
बाजी अडकलेत खिंडीत....तोफांची वाट बघत....
छत्रपती पण हळवे होतात....देव पण माणुस होतो, त्या क्षणाला.....
दिग्पालजी, पावनखिंड काही पिच्छा सोडत नाहीये डोक्याचा....
रणी निघता शुर....
न पाहे माघारे....
काय तो प्रसंग....काय ते गायन...काय ते संगीत...
आणि, शिवा काशीद.....
राजे, तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दार दिसतंया..लोकं सांगतील,.शिवा असा बिलंदर...शिवाजी राजांचं मरण मेला....
शहारा आणनारा प्रसंग....
काय ती स्वामीभक्ती...काय तो त्याग....
लहान मुलांना आवर्जुन दाखवा "पावनखिंड"....