सावरकर कुटुंब म्हणजे धगधगतं अग्निकुंड . राष्ट्रीय स्वा: ! इदं न मम !!
सावरकर म्हणजे नियतीने एका दैदिप्यमान व्यक्तिमत्वाची केलेली क्रूर विटंबनाच वाटते . स्वतंत्र भारतातही त्यांना बंदिवास भोगावा लागणं ह्याला दैवदुर्विलासच म्हणावं लागेल .
वीर सावरकरांच्या दिव्य आयुष्याची अन् कार्याची भव्यता चित्रित करण्यात हा चित्रपट बहुतांशी यशस्वी झाला आहे. घटनांमध्ये झालेले काही थोडे किरकोळ बदल अन् घेतलेलं थोडसं चित्रपटीय स्वातंत्र्य (cinematic liberty) हे लक्षात घेऊनही चित्रपट सर्वांगसुंदर झाला आहे.