प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, ओंकार राऊत, भोजने, गौरव मोरे, दत्तू मोरे हे कलाकार अती उत्तम अभिनय करतात आणि बरेच पंच वसूल करतात.
परंतु आजकाल समीर चौगुले, वनिता खरात हे कलाकार अतिशय फालतू वागतात. इतर कलाकारांना दाद देताना समीर चौगुलेचे जागा सोडून इतर ठिकाणी फिरणे, त्याला ग ची बाधा झाली आहे हे दर्शविते. एकसारखे गौरव मोरेचा अपमान करणे, त्याला मारणे हे समीरच्या कमकुवतपणा चे दर्शन घडविते. एका उभरत्या कलाकाराला डाऊन ग्रेड करणे बरे वाटत नाही.
जर आपल्या कार्यक्रमाची टीआरपी कमी व्हावी असे वाटत नसेल तर समीर ला कंट्रोल करणे महत्त्वाचे आहे.
वनिता खरात सुद्धा बऱ्याच वेळा ओव्हर ॲक्टिंग करते. ते तिने टाळावे.
आम्ही कुटुंबीय चला हवा येऊ दे हा प्रोग्राम टाळून आपला प्रोग्राम बघतो कारण तिथे निलेश साबळे यांनी सर्व सूत्रआपल्या हाती घेऊन वाट लावली आहे. तसे तुमच्या बाबत होऊ नये असे वाटते म्हणुन हा प्रपंच.