स्वातंत्रवीर होणे सोपे नाही, ते का सोपे नाही किंवा आता पर्यंत स्वातंत्रवीर दुसरा कोणी का होऊ शकले नाही याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सावरकरांचे जीवन, त्यांच्या जीवनावरील हा चित्रपट त्यांनी केलेल्या त्यागाचे, समर्पणाची जाणीव करून देतो. निस्वार्थ होऊन फक्त मातृभूमीची सेवा करणे म्हणजे काय हे सावरकरांनी दाखऊन दिले आहे. सर्व हिंदूंनी एक रहावे या साठी आयुष्य पणाला लावले आहे. वीर सावरकर हे एक सुर्य आहे आणि आपण त्यांच्या विषयी बोलणे म्हणजे सूर्या समोर एखादा मिणमिणत्या दिव्याने उजेड पाडण्या सारखा प्रकार आहे. एकच सांगतो नेते आणि रत्न खुप झाले, स्वातंत्रवीर हे एकच होते एकच आहे आणि एकच राहतील ते म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर ...
सर्वांनी हा चित्रपट अवश्य पहावा...पूर्वीच्या राजकारणाचा खरा चेहरा दाखवण्यात आला आहे...बाकी सर्व सुज्ञ आहातच...