नेहमी प्रमाणेच आजचा -०९ मार्च चा चला हवा येऊ द्या चा भागही अफलातून होता. हसून हसून पोट दुखावं असा. . . फक्त आणि फक्त एक गोष्ट खटकली, ती म्हणजे, शिलिब्रिटी पॅटर्न विभागात उमेश जगताप यांच्या तोंडी असलेला एक संवाद. तो म्हणजे " तू इंजिनिअर, डॉक्टर काय शिक्षक होण्याच्या लायकीचा नाहीस, एवढंच काय तू शिपाई सुद्धा होण्याचाही लायकीचा नाहीस." . . . . म्हणजे शिक्षकी पेशा हा कमी दर्जाचा आणि शिपाई हा तर फारच खालच्या दर्जाचा पेशा आहे काय ? . . हा निश्कर्श काढणारे आपण कोण ? . .सुशिक्षित आणि सुरक्षित समाजा साठी हे दोन्ही पेशे किती मोलाचे आहेत, हे काय केल्याने कळेल ??? कधी कधी असेच अभिरूची हिन पंचेस काळ्या-गोर्या रंगाचे बाबतीत तुमच्या कार्यक्रमात बघायला मिळतात. . . जमल्यास ते हीटाळा. प्लीज हवा येऊ द्या पण डोक्यात नका जाऊ देऊ..