आज घरच्यांसोबत स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट बघण्याचे भाग्य लाभले, थोडक्यात या चित्रपटाचे वर्णन करायचे तर अप्रतिम, नि:शब्द! ही चित्रपट बघताक्षणीची पहिली प्रतिक्रिया आहे, पण या अप्रतिम कलाकृतीला योग्य न्याय देण्यासाठी सविस्तर अभिप्राय आवश्यक आहे.
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏🏻
स्वातंत्र्यवीर ते स्वातंत्र्यवीरच,त्यांची लोकप्रियता व त्यागाच्या मापणाला चित्रपट यशापयशाच्या आधाराची गरज नाही,हल्ली चित्रपट निव्वळ मनोरंजन,विरंगुळा म्हणून बघितले जाते या चित्रपटात ते नाहीच.
*गर्दी नसलीच तरी दर्दी असतील.*
हिमालयाची भव्यता आणि सागराची अथांगता प्रत्यक्षात अनुभवल्याशिवाय येत नाही असे म्हणतात, परंतू सावरकरांचे आयुष्य आणि त्यांच्या कार्याची भव्यता तीन तासाच्या चित्रपटात दाखवणे अगदी अशक्यप्राय आहे, पण तरीही हया चित्रपटात रणजीतजीनी हे शिवधनुष्य अगदी यथायोग्य पेलले आहे,
आज जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रतिमा हनन करण्याचे प्रयत्न सर्व थरातून सुरू आहेत आशा गढूळ वातावरणात सावरकर हा चित्रपट जो विचार मांडतो ते खरोखरच अभिनंदनीय आहे. रणदीप हुडडा सर आपले खुप खुप आभार. 💐💐
मनिषा दुशी.