आज खूप दिवसांनी मनासारखा चित्रपट पाहायला मिळाला. या कथनाकातून खूप काही शिकायला मिळते. आयुष्याच्या प्रवासात अवचित भेटलेल्या व्यक्तींच्या सहवासात आपल्याला अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे अप्रत्यक्षरीत्या मिळत राहतात. जी उत्तरे आपल्याला कोण सांगू शकत नाहीत ती नकळत घडलेल्या गोष्टीतून मिळत राहतात.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण असतात ते विसरू शकत नाहीत परंतु जर प्रॅक्टिकल विचार केला तर आयुष्य अजून किती सुंदर आहे याची प्रचिती सरते शेवटी येत राहते. त्यामुळे प्रत्येक क्षण हा एक सुखद अनुभव म्हणून पाहिल्यास आपल्याला नेहमी मार्ग सापडत राहिल हा संदेश मात्र हा चित्रपट पाहिल्यावर नक्की मिळेल.
चित्रपटातील सर्व नायक, नायिका यांनी खूप छान काम केले आहे. विशेष म्हणजे सुहास जोशी यांची भूमिका खूप छान वाटली सह कुटुंब पहावसा असा चित्रपट आहे.