या महिन्यात रिलीज झालेली ही एक अप्रतिम कलाकृती..! संगीतप्रेमींसाठी अदभुत नजराणा पेश केलाय Amazon Prime ने या वेबसिरीजच्या माध्यमातून. वेबसिरीज म्हटलं की adult content हे समीकरण इथे जवळपास खोडुन काढण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेत. तसं थोड्याफार शिव्या इथेही घातल्यात पण त्या बळेच कोंबल्यासारख्या वाटतात.
नसरुद्दीन सरांचा दमदार अभिनय आणि त्यास अतुल कुलकर्णीची जोड खूपच मस्त जमलीय. नवख्या कलाकारांनीसुद्धा उत्तम काम केलंय.
विशेष म्हणजे 3 इडियट मधला मिलिमीटर इथे किलोमीटर झालाय.
राजस्थानच्या संस्कृतीचे दर्शन तुम्हाला या सिरीजमध्ये अनुभवायला मिळते. अगदी संगीत, खाद्यसंस्कृती, लोकजीवन, राजेराजवाडे. आधुनिक संगीत आणि शास्त्रीय संगीत यांचा मिलाप इथे जमवण्याचा प्रयत्न केलाय. पण शेवटी कसोटीवर उतरतं ते शास्त्रीय संगीतच अगदी बावन्नकशी सोन्यासारखं...!
कट्यार काळजात घुसली नंतर मला आवडलेली ही दर्जेदार संगीतमय निर्मिती.
आपणही आवर्जून पाहा..!