काही वेळापूर्वीच मी चित्रपटगृहातून बाहेर आलो.... " शेर शिवराज" हा चित्रपट बघून!!!
अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले!!!! तुम्ही सगळ्यांनी....सगळ्या छत्रपतींच्या मावळ्यांनी हा सिनेमा जरूर पाहावा!!!!! ही माझी कळकळीची विनंती आहे!!! मी काही तुलना नाही करत पण जसे आपण RRR, K.GF, हे चित्रपट डोक्यावर उचलून धरले आहेत....तसाच आपण हा ही चित्रपट डोक्यावर घेऊयात ही माझी विनंती!!!
चित्रपट संपूर्ण सुंदरच आहे याला अपवाद नाहीच...पण हा चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त जेव्हा आवडेल...तो भाग म्हणजे या चित्रपटाचे शेवटचे ३० मिनिट!!!!!!!!!!!!
जितकं कौतुक करावं तितकं कमीच.......आणि सगळ्या अभिनेते आणि अभिनेत्रींनी उत्तम कामगिरी केली आहे!! तुम्ही नक्कीच हा चित्रपट बघावाच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
प्रत्येक अभिनेता/ अभिनेत्री ने भूमिका अक्षरशः जगल्यात!!!
आणि मुकेश ऋषी जी यांनी काय थरारक आणि अप्रतिम काम केलंय अफजल खान म्हणून!!!! वाह!! चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत ही खूप अप्रतिम आहे!! देवदत्त मनिषा बाजी यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे!! चिन्मय मांडलेकर यांच्या विषयी तर बोलायला शब्द अपूरे पडत आहेत!!!
दीगपाल लांजेकर हे तर या सगळ्याचे शिल्पकार आहेत त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच!!!!
सगळ्यांनी प्लीज जसा K.G.F आणि RRR डोक्यावर घेतला तसा आपला मराठी "शेर शिवराज" ही डोक्यावर उचलून घ्या!! तुडुंब कमाई करू द्या आणि अजून असे अप्रतिम छत्रपती शिवाजी महराजांवरचे चित्रपट बघायला मिळू द्या!! श्री शिवराज अष्टक मधील हे चौथे पुष्प आहे, पुढच्या सगळ्या पुष्पांसाठी दिगपाल लांजेकर यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!
हर हर महादेव!! जय भवानी, जय शिवाजी!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩