इतिहासाची कोणतीही मोडतोड न करता अत्यंत उत्कृष्टपणे सत्यशोधक चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे. ज्योतिबा फुलेच इतके मोठे होते की त्यांचा संघर्ष मांडणारा चित्रपट आपसूक त्या उंचीवर जाऊन पोहोचतो. अभिनेते यांनी भूमिकेला न्याय दिला असच म्हणता येईल. फुलेंचे कार्य कमी वेळात जाणून घ्यायचं असेल तर चित्रपट ते काम करू शकेल. एक दस्तावेज म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जाईल. चित्रपट बघा नक्कीच तुम्हालाही आवडेल.