स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन सामान्य माणसाला कसे कळावे?
कमीतकमी हा सिनेमा पाहिल्यावर, त्यांचा जीवनपटातील काही अंश तरी सामान्यांना कळेल असे वाटते... ज्यामुळे स्वा. सावरकर यांच्या विषयी अजून बरंच काही समजावे.. अशी उत्सुकता सिनेमा पाहणाऱ्यांच्या मनात निर्माण व्हावी!
सामान्यातलं असामान्यत्व म्हणजे काय? याचं उत्तर आहे. स्वा. सावरकर!! त्यांच्या वर हिंदीत सिनेमा आणून एक खूप मोठे काम श्री. रणबीर हुड्डांनी केले आहे.. त्यांच्या या धाडसाचे खूप खूप कौतुक.