बऱ्याच गोष्टी गरज नसतांना घातल्या आहेत ह्या सिनेमात. जसे की, हेमल्या - काहीही गरज नव्हती त्या पात्राची, ते दोन वादक, लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल - हे दोन पात्र सिनेमात आहेत खर, पण धड दिसतील तर शप्पत, त्यांच्या मुखातून dialogue ऐकण सोडूनच द्या. आनंद इंगळे नी साकारलेलं दुसरं पात्र, सुनील देवल - पाहिलं पात्र, तात पुरता असले असते तर ठीक असते, पण हुबेहूब दुसरे पात्र त्याच आडणावाच; गरजच नव्हती. प्रवीण तरडे आणि खुद्द महेश मांजरेकर ह्या दोघांचीही पात्र अगदी नकोशी वाटतात. पॅटर्न हा शब्द पुन्हा पुन्हा घेऊन त्या शब्दाचा अगदी किळस आणला आहे सिनेमात. गाणी नकोशी आहेत अगदी. मुळात, सिनेमाची पत कथा एकदम वंगाळ आहे.