खूप छान चित्रपट आहे.-फर्जंद प्रमाणेच हा सुद्धा तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो. शाहिस्तेखान याची लाल महालात तीन बोटे तोडली यापेक्षा जास्त आपल्याला काही माहिती नव्हते पण नेमके ते का आणि कसे घडले तसेच त्यानंतर आणि आधी काय घडले हे तपशीलवार आपल्याला हा चित्रपट सांगतो. गनिमी कावा म्हणजेच शाहिस्तेखान याच्यावरचे सर्जिकल स्ट्राईक!! प्रत्येक भारतीयाने बघायलाच हवा हा चित्रपट!