''महाराष्ट्राची हास्य जत्रा'', वर्षानुवर्षे सतत नवीन नवीन विषयावर भरभरून हसवणारे कधी सहजपणे सामाजिक विषयावर हळुवारपणे भाष्य करणारे असा हा कार्यक्रम कधीही संपू नये असे नेहमीच वाटते. सगळ्यात कमाल म्हणजे यात जीव ओतून काम करणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्यांची आणि विनोदाचे भान ठेऊन दिग्दर्शन करणाऱ्या सचिन गोस्वामी सरांची आणि सचिन मोटे सरांची. तुमच्या सगळ्या कलाकारांप्रती आभार आणि कृतज्ञता व्यक्त करून संपूर्ण जगाला हसविण्याचे कठीण काम सहजपणे, खेळकरपणे करत असल्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. सुप्रीम पॉवर तुम्हाला सगळ्यांना आनंदी आयुष्य, समृद्धी आणि भरपूर यश, पैसे देवो ही प्रार्थना. सुहास बंडू साळुंखे