इथे -५ स्टार्स देण्याचा पर्याय नाहीये म्हणून १ स्टार फक्त आणि दिलीप प्रभावळकर यांनी केलेल्या दर्जेदार अभिनयाला देतोय. रात्री ११ चा शो ६० टक्के गर्दी सह खूप आशेने पहिला अगदी इंटरवल पर्यंत ठीक वाटला नंतर पूर्व अर्ध अक्षरशः पोरकट बालिश मूर्ख पणाचा असा हा होता. सगळे कोकणी लोक जे आशेने आलेले ते निराश होते. हसत होते कुज बुज करत होते यांचा पोरकट पणाचा. दशावतार सोडून कांतारा, तुंबाड, भेडिया अश्या कमर्शियल चित्रपटांचे ढुंगण चाटणार सिनेमा यांनी केला. पार्श्व-संगीत ज्याने कोणी केलं आणि ज्या फिल्म मेकर्स ने हे संगीत अप्रूव केले त्यांच्या ७ पिढ्या बहिऱ्या जन्माला येतील की काय असं ते नीरस आणि टॉर्चर होत. दशावतारी कलाकारांना समर्पित केलेला हा सिनेमा जर दाखवला तर ते त्यांची खूप मोठी निराशा होईल. तुमच्या सिनेमाला गर्दी झाली पण तुम्ही त्याना निराश केलय आणि असंच चालू राहिल तर मराठी चित्रपटाचा काळ सोडा वेळ पण बदलणार नाही. फर्स्ट हाफ बघून जी उत्सुकता वाढली होती त्याचा दुसऱ्या हाफ मध्ये चुराडा केलेला बघून झालेल्या त्रासा मुळे हा रिव्यु पोट तिडकीने लिहत आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर फरक पडत नाही कारण खरं नेहमी कडू असतं. धन्यवाद!