नुकताच प्रदर्शित झालेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा बघितला. रणदीप हुडा यांनी उत्तम अभिनय आणि दिग्दर्शन केले आहे. ज्या लोकांना स्वा. सावरकरांचा इतिहास माहीत नाही किंवा जे लोक अर्धवट काहीतरी वाचून स्वतःची चुकीची मत मांडतात अशा लोकांनी तर आवर्जून हा सिनेमा बघायला हवा. सावरकरांनी केलेले काम आणि त्यांचा त्याग हा खुप मोठा आहे. ३ तासांच्या सिनेमात ते सर्व दाखवणं शक्य नाही, पण रणदीप हुडा यांनी स्वा. सावरकरांचा जीवनपट बराचसा उलगडून दाखवला आहे.
सगळ्या लोकांनी एकदा तरी हा सिनेमा बघायला हवा असे मला वाटते.