सदर मालिकेमध्ये, लहान मुलांवर संस्कार देण्या ऐवजी त्यांच्यावर क्रूरतेने सूडाची भावना, असूया पोटी लहान (बनी) मुलावर - अन्याय होताना दिसत आहे. तुम्हांला महिला कश्या स्वभावाच्या असतात हे दाखवायचे असेल तर त्या महिलांना तात्काळ त्यांच्या चुकीचे वागत असल्याचा धडा शिकवणे गरजेचे आहे.
तसेच त्या दोन लहान मुलींवर संस्कार न देता सावत्र भावावर असूयाने तिरस्काराने संस्कार दाखवते ते चूकीचे आहे.
तुम्ही दाखवित असलेले दृश्य सर्व लहान / मोठ्यांवर चुकीचे संस्कार होऊन चुकीचा संदेश जात आहे. तुम्हाला हे मान्य नसल्यास ही मालिका बंद करावी अथवा संस्कारीत बदल दाखवावा.