खूप वर्षानंतर असा छान चित्रपट पाहायला मिळाला ज्यात खरं अव्यक्त प्रेम, जबाबदारी, त्याग, कलेची कदर, जिद्ध, म्हणजे काय हे दिग्दर्शकांनी शुद्ध भाषेत कोणत्याही अश्लीलतेचे प्रदर्शन न करता घडविले. संवाद उत्तम, गाणी उत्तम, संगीत उत्तम, पेशवाई ची भव्यता अप्रतिम, सर्व कलाकारांचे अभिनय उत्तम, प्राजक्ता चे सौंदर्य उत्तम, ग्रीष्मेश ची शैली उत्तम... संपूर्ण कुटुंबातील व्यक्ती सोबत बसून पाहू शकतात असा चित्रपट. प्रत्येक क्षणी उत्कंठा शिगेला नेणारा चित्रपट. मराठी भाषेचीआणी राज्याची भव्यता दाखविणारा चित्रपट.