सुंदर कथा, सुंदर अभिनय,अप्रतिम दिग्दर्शन, लाजवाब चित्रीकरण आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीत व नृत्याविष्करांनी सजलेली अशी "फुलवंती" नक्कीच चित्रपटगृहातच पाहण्यासारखी कलाकृती आहे.
विशेष कौतुक अभिनेत्री-निर्माती प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी आणि दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडे यांचं..👏👏
हा चित्रपट नक्कीच पहावा याची अनेक कारणे आहेत..त्यापैकी एक म्हणजे ऐतिहासिक पेशवे काळ अनुभवण्याची संधी..चित्रपट पाहताना अगदी पहिल्याच सीन मधे आपण त्या काळात आपोआप ओढले जातो आणि रमून जातो.चित्रपटात सर्वच कलाकारांनी सहज सुंदर अभिनय केलेला आहे..फुलवंती च्या चेहऱ्यावरचे सगळेच expresions अहंकार, राग, अपमान, प्रेम, त्याग, प्राजक्ताने इतक्या सुंदर पद्धतीने मांडले आहेत, खरच काबिल ए तारीफ..शास्त्री बुवांच तर काम अत्यंत चोख झालं आहे.. आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी यांचं काम स्वतः दिग्दर्शनाची धुरा सांभाळत स्नेहलताईंनी उत्तम केलं आहे..जे त्यांचं भावविश्व दाखवत..ऋषिकेश जोशी, वैभव मांगले, निखिल राऊत, यांचं काम मला विशेष आवडलं...आणि खूप enjoyy केलं.
हास्याजत्रेतील सर्व पाहुणे कलाकारांचा presence पण फार आवडला.
आणि सर्वात महत्त्वाचं , जो या चित्रपटाच्या कथानकाचा आत्मा आहे, नृत्य आणि गाणी...कमालीच्या सौंदर्यासह प्राजक्ता ने कत्थक, लावणी, भरतनाट्यम ह्या तीनही नृत्यप्रकारचे सुंदर दर्शन घडवले आहे.. शेवटपर्यंत चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो..खरंच सिनेमा इतका सुंदर बनला आहे की अगदी पुन्हा पुन्हा पहावसा वाटतो
Truely mesmerising...Must watch Masterpiece movie 🙌