दमदार अभिनय, उत्कृष्ठ दिग्दर्शन, संवाद उत्तम...
आता सावित्रीबाईं वर बनवायला हवा या टीम ने..
स्त्री शिक्षणाचे प्रणेते, जातिभेदाच्या भिंती दूर सारत शोषितांच्या मुलांना शिक्षणाची कवाडं खुली करून देणारे महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य इतपतच मर्यादित नाही. थोर व्यक्ती अंगी थोरपणा घेऊनच जन्माला येत नाहीत. सर्वसामान्यांसारखंच त्यांचंही आयुष्य असतं, मात्र योग्य वेळी योग्य विचार देणाऱ्या व्यक्ती, पुस्तकं त्यांच्या आयुष्यात येतात. पटलेला विचार कृतीत आणण्याचं धाडस, कोणाचीही तमा न बाळगता योग्य विचार आणि कृती सातत्याने करत राहण्याचा ध्यास यातूनच कार्य उभं राहतं, समाज घडत जातो. एका महात्म्याच्या आयुष्याचा वेध घेताना त्याची जडणघडण कशी झाली? शिक्षणामुळे मिळालेले विचार आणि स्वत:च्या सखोल निरीक्षण-अभ्यासातून त्याने कमावलेले विचार समाजात कसे झिरपत गेले याचे अत्यंत सहज आणि वास्तवदर्शी पद्धतीने केलेले चित्रण ‘सत्यशोधक’ या चित्रपटात पाहायला मिळते.