ही मालिका अत्यंत रददड आहे.वास्तवाशी अजिबात संबंध नसलेली, जरूरी नसताना आकाशाची हिरोगिरी दाखवण्यासाठी काही प्रसंग उगाच घुसडलेले आहेत.बनी आणि त्याच्या आई मागे जणू साडेसातीच लागलेली आहे. पण साडेसातीत पण इतक्या वाईट घटना घडत नाहीत.नातवडांना चांगली शिकवण देण्याऐवजी दुसऱ्यांशी दुष्टपणे कसं वागावं असं सांगणारी आजी कुठली असेल?
थोडक्यात ही मालिका पहाण्यात अजिबात वेळ घालवू नये.
शीर्षक गीत सोडून या मालिकेत काहीच चांगले नाही.