पहिल्या दिवसापासून मी बिग बॉस बघतो आणि निरीक्षण करतो आहे . मला वाटले होते कि मराठी आहे म्हटल्यावर काहीतरी वेगळे पाहायला मिळेल पण आजपर्यंत तसे काहीही पाहायला मिळाले नाही .
१) पक्षपातीपणा दिसायला लागला आहे . Scripted असण्याची दाट शंका आहे आणि ती प्रबळ होत चालली आहे .
२) इथे Public voting ला काडीचीही किंमत नाही . बिग बॉस च स्वतःच्या अधिकारात निर्णय घेणार ... कोणाला काढायचे आणि कोणाला ठेवायचे हि ठरविणार .
३) राजेश ला अज्ञातवासात ठेवले ... असे असेल तर आरती आणि विनीत ने काय पाप केले होते .
४ ) बिग बॉस ला राजेश दादा आणि रेशम ताई चे गुलु गुलु ("XX" चाळे) दाखवून TRP मिळवायचा आहे . मराठी बिग बॉस मध्ये असले थिल्लर चाळे बघायला मिळतील हि अपेक्षा केली न्हवती .
५) हा फॅमिली शो नाहीच . आणि एंटरटेनमेंट शो आहे कि नाही ...हा वैयक्तिक प्रश्न ...
६ ) जुई ने सई ला ब्लॉक फेकून मारला होता . हा आरोप जुई ने फेटाळला ... जुई ला video दाखवून तिचा खोटेपणा उघड करता आला असता आणि घरातल्या इतरांचा खोटेपणा हि ... पण तसे केले जात नाही .
७) भूषण ला जुई ला safe करता आले असते पण त्याने रेशम ला safe केले ..इथेच "दाल में कूच कला है " .
८) पुढे जाऊन राजेश दादा आणि रेशम ताई यांचा थिल्लरपणा बिग बॉस ला दाखवायचा आहे आणि आंबट शौकीन लोकांचा TRP मिळवायचा आहे ...म्हणून रेशम ला safe केले गेले .
९) इथे उच्च - नीच ... सिनियर - जुनियर ... A Grade - B Grade असा भेद-भाव , द्वेष , घृणा , मत्सर दिसून येतो (For some peoples only ) .
९ ) आत्तापर्यंत च्या एपिसोड वरून असे दिसते कि बिग बॉस ला मराठी संस्कृती ... मराठी पणा - मराठी बाणा ... मराठी लोकांची विचारसरणी याच्या बद्दल काडीचीही माहित नाही ...