हा सिनेमा हिंदी भाषेमध्येच रिलीज झाला पाहिजे होता कारण स्वातंत्र्यवीर हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर पूर्ण हिंदुस्थानचे नेते आहेत. त्यांची तळमळ हा अखंड हिंदुस्थान करण्याची होती ना की महाराष्ट्र मुक्त होण्याची जी ह्या सिनेमा मध्ये दाखवली आहे ह्या सिनेमा मध्ये सावरकरांच्या संपूर्ण जीवनाचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे तस तर त्यांच अख्ख आयुष्य हे धगधगत आग्निकुंड आहे जे एका सिनेमा मध्ये दाखवणं केवळ आशक्य आहे.
ह्या सिनेमा मध्ये त्यांच्या घरच्यांच्या इतर सदस्यांनी केलेले प्रयत्न दाखवता आले पाहिजे होते त्या तिघी ही तितक्याच महत्वाच्या क्रांतिकारी आहेत. पण कदाचित वेळे अभावी ते शक्य झालं नसावं अजून बरेच दाखले आहेत जे त्रोटक पणे नमूद केले गेले आहेत. त्यांच्या मुळे किती सशस्त्र क्रांतीकारी उदयाला आले आणि स्वातंत्र्य हे नुसत्या अहिंसेमुळे मिळालेली नाही तर त्या साठी वासुदेव बळवंत फडके यांच्या पासून,१८५७ च्या उठाव मंगल पांडे बलीदान ह्या सर्व गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत.