स्टार प्रवाह या चॅनलच्या माध्यमातून प्रसारीत होणाऱ्या सर्व मराठी मालिका, सध्या इतर कुठल्याही मराठी माध्यमांतून प्रसारीत होणाऱ्या मालिकांपेक्षा अतिशय सरस दर्जांच्या आहेत असेच म्हणावे लागेल. त्यांत 'आई कुठे काय करते' ह्या मालिकेचे एकूणच लिखाण अतिशय उच्च दर्जाचे आणि वास्तववादी आहे. त्यासाठी श्रीमती मुग्धा गोडबोले यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. तसेच सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका अगदी चोंख बजावलेल्या आहेत. विशेषतः श्रीमती मधुराणी गोखले प्रभूलकर यांनी अरुंधतीची भूमिका उत्तम रीतीने साकारलेली आहे. सध्याच्या समाजाची मानसिकता लक्षांत घेता, सकारात्मक आणि वास्तववादी संदेश देण्याचा प्रयत्न प्रत्येक मालिकेतून देणे हे अत्यंत गरजेचे आहे, आणि असे लिखाण केवळ अभ्यासू लेखकच देऊ शकतो.