खूप सुंदर बनवला आहे चित्रपट. सावरकरांवरती चित्रपट बनवणं साधी गोष्ट नाहीये. जी व्यथा मराठी इंडस्ट्री मधले लोक दाखवू शकले नाही ती रणदिप हुड्डा ने कुठलिही अतिशयोक्ती न करता, प्रसीद्धीसाठीचा हापापलेपणा न दाखवता, अगदी स्वच्छपणे खरीखरी मांडली आहे. एक कलाकृती म्हणून ही हा चित्रपट खूप दर्जेदार आहे. दिग्दर्शन, संहिता लेखन, भूमिका उभी करणं, अभिनय, संगीत, प्रसंग सांगण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी खूपच उत्तम पद्धतीने हाताळलं आहे. सगळ्या कलाकारांना खूप खूप धन्यवाद… उत्तम कलाकृतीतून तुम्ही खरा इतिहास लोकांसमोर मांडलात….👍🙏😍