एकांतात प्रश्न पडतात आणि प्रवासात उत्तरं सापडतात. मला वाटतं त्या उत्तरं सापडण्याची गोष्ट म्हणजेच 'झिम्मा 2' हा सिनेमा. सहजता ही या सिनेमाची सर्वात जमेची बाजू. जे काही दिसतं, जे काही घडतं ते अगदी सहज. आम्ही काही तरी सांगतो आहोत असा आव अजिबात न आणता तरीही खूप काही सांगून जाणारी ही गोष्ट आपल्या प्रत्येकानेच अनुभवायला हवी.