अप्रतिम.
एक जहाल क्रांतीकारक..एक स्वातंत्र्यवेदीवर पेटलेला धगधगता ज्वालामुखी..
एक हजारो क्रांतिकारकांचा मार्गदर्शक..
तात्याराव म्हणजे साक्षात तेज..त्यांचं अवघं आयुष्य म्हणजे जणु महाकाव्यच....
त्याला कसं तुम्ही पळांच्या नी घटीकांच्या चाकोरीत बसवणारात...?? शिवधनुष्यच ते...
पण रणदीप हूडानं हे शिवधनुष्य उचललंय...
नुस्तं उचललंच नाही, तर पेललंय सुद्धा..
'स्वातंत्र्यवीर सावरकर.. हू कील्ड हीज स्टोरी'
अफाट..
निव्वळ अफाट बनलाय आहे सिनेमा..
--