अप्रतिम चित्रपट...👌🏽👌🏽 या चित्रपटानिमित्त आम्हाला इतिहास जवळुन बघण्याचा अविस्मरणीय अनुभव भेटला...
पाठ्यपुस्तकाच्या चौकटीतून प्रत्यक्ष डोळ्यादेखत इतिहास पहायला मिळाला...मराठा साम्राज्य किती उच्च पातळीचे आहे...मराठा साम्राज्य स्वराज्यासाठी किती एकनिष्ठ आहे...हे आम्हाला पुस्तकातुन कळलेच पण पडद्यावर पहाण्याचा वेगळाच अनुभव आम्हा प्रेक्षकांना "सरसेनापती हंबीरराव" निमित्त प्राप्त झाला...
मी अभिमानाने सांगु शकतो की, आपली मराठी चित्रपट सृष्टी देखील Bollywood, Tollywood (South film industry) आणि Hollywood ला टक्कर देऊ शकते...
मी "सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटातील सर्वच कलाकारांना, दिग्दर्शक..म्हणजे सगळेच पडद्यावरचे, पडद्यामागचे अशा सर्वांचे आभार...त्यांनी इतका सुंदर चित्रपट आम्हा जिज्ञासु प्रेक्षकांसमोर सादर केला.
पुनश्च एकदा धन्यवाद सर्वांचे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सदिच्छा 🙏🏼😊