आतापर्यंत च्या डान्स च्या कार्यक्रमात हा कार्यक्रम सर्वात वेगळा ठरला आहे. पहिल्यांदा मी माझ्या आई आणि वडिलांना हा कार्यक्रम खूप उत्साहाने पहात्ताना बघितलं. हा कार्यक्रम केवळ नाच नसून या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक नवीन प्रकार सुरु झाला अस मला वाटते, तो प्रकार म्हणजे "नाट्यछटा नाच" असा होईल. नाचण्याच्या माध्यमातून इतक्या सुंदर पद्धतीने विषय मांडणे आणि ते हि इतक्या लीलया कि आम्ही सर्व जण एकरूप होऊन जात होतो. नाच बघतांना तो समजणे म्हणजे या कार्यक्रमाच्या यशस्वितेची पावती आहे. वेगवेगळ्याया विषयांना सादर करून खूप छान संदेश दिला. सर्व स्पर्धकांना मला वोट द्यावे असे वाटते. परीक्षकांची च परीक्षा आहे कि कोणाला विजयी करायचं. माझ्या दृष्टीने सर्व स्पर्धक विजयी आहे. म्हणून मी कोणालाच वोट दिले नाही, माझे वोट सर्वांना आहे. नृत्याचे सर्व रस यांचे सादरीकरण झाले. उत्तम प्रकारे सोनी च्या टीम णे कार्य केले आहे. सर्वांना शुभेच्छा, माझ्याकडून माझ्या आई, वडील, पत्नी आणि मुलाकडून. धन्यवाद.