*आज वीर सावरकर हा हिंदी चित्रपट पाहिला. चित्रपट अतिशय प्रभावी आहे . प्रत्येकाने आवर्जून पहावा म्हणजे सावरकरांनी किती सोसलं याची जाणीव होईल आणि शतपैलू सावरकरां चे ओझरते दर्शन होईल. दिग्दर्शकाचं कौशल्य अनेक प्रसंगात फार सुंदर प्रतीत होतं. विशेषतः त्यांचा मुलगा प्रभाकर याचे निधन झाल्याचा प्रसंग असो किंवा पहिल्यांदा मांसाहार करण्याचा प्रसंग असो ,रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळातील त्यांचं वय दर्शवणारा प्रसंग असो , गांधी हत्येनंतर त्यांची प्रतिक्रिया, अंदमान येथील कैद्यांचा होणारा छळ, सख्या मोठ्या भावाची एकच तुरुंगात असून सुद्धा नऊ वर्षांनी झालेली भेट, त्यावेळची झालेली तगमग आणि अखंड भारताचा ध्यास या सर्वच गोष्टी फार सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत.*
*रणदीप हुडा चा अभिनय उत्कृष्ट . तो सावरकरांच्या भूमिकेत खरच शोभतो. त्याची चेहरे पट्टी, शरीरयष्टी सर्व काही सुयोग्य. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की या चित्रपटासाठी त्यानी जवळजवळ 30 किलो वजन कमी केलं. अनेक अडचणी येऊन सुद्धा चित्रपट पूर्ण केला .*
🌹🙏सर्वांनी अवश्य पहावा , आपल्या घरातील तरुण पिढीला हा चित्रपट पाहण्याचा आग्रह धरावा जेणेकरून राष्ट्रहितासाठी काहीतरी करण्याची प्रत्येकाला प्रेरणा मिळेल.🙏🌹*