स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहणं म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्या क्रांतिसूर्याला नि हजारो क्रांतिकारकांना मानवंदना देणेच आहे.रणदीप हुडाने हा चित्रपट खूप ताकदीने पेलला आहे.अत्यंत संयमित,अत्यावश्यक असाच चरित्रप्रवास अडीच-तीन तासांत खूप प्रभावीपणे घेतला आहे.प्रत्येक स्वाभिमानी भारतीयाने हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन अवश्य पहायला हवा.नव्या पिढीला सावरकर नावाचे तेज काय होते हे सांगितले,दाखवले तरच उद्याचा अखंड भारत घडवतां येईल.